20 October 2020

News Flash

लडाख सीमावाद: भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तब्बल १३ तासाची मॅरेथॉन बैठक

LAC वर आतापर्यंत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत...

लडाख सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये काल सहाव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली. तब्बल १३ तासाच्या मॅरेथॉन चर्चेनंतर ही बैठक संपली. सकाळी सुरु झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय प्रतिनिधी लवकरच आपल्या वरिष्ठांना नेमकी काय चर्चा झाली, त्याची माहिती देतील.

१४ कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हरींदर सिंह, लेफ्टनंट जनरल पी.जी.के.मेनन आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव या बैठकीला उपस्थित होते. मोल्डोमध्ये सोमवारी सकाळी १० वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री ११ वाजेपर्यंत सुरु होती. दोन्ही बाजुच्या कॉर्प्स कमांडरमध्ये जवळपास महिन्याभरानंतर चर्चा झाली. या दरम्यान पँगाँग सरोवराच्या परिसरात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

या बैठकीआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांची मागच्या शुक्रवारी एक बैठक झाली. त्यात मोल्डोच्या बैठकीसाठी भारताचे मुद्दे आणि अजेंडा निश्चित करण्यात आला. भारतीय सैन्याने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील महत्त्वाचे उंचावरील प्रदेश आपल्या ताब्यात घेतलेले असताना ही बैठक होत आहे. भारतानो जो प्रदेश ताब्यात घेतलाय, तिथून चिनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे. त्यामुळे आता टेबलावरील चर्चेत निश्चित भारताला याचा फायदा होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 10:59 am

Web Title: india china corps commander level talk went on for thirteen hours dmp 82
Next Stories
1 आणखीन एक बँक घोटाळा : आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीने नऊ बँकांना घातला १४०० कोटींचा गंडा
2 खासदार नुसरत जहाँ यांनी मागितली पोलिसांची मदत, जाणून घ्या कारण
3 चोवीस तासांत देशात ७५,०८३ रुग्णांची नोंद; करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ५५ लाखांचा टप्पा
Just Now!
X