28 September 2020

News Flash

बापरे! करोनाबाधितांची संख्या ४७ लाखांच्या पुढे; २४ तासांत ९४,३७२ नवे रुग्ण

देशात आतापर्यंत ७८ हजार ५८६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ४७ लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मागील तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत देशात ९६ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले होते.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ३७२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ लाख ५४ हजार ३५७ झाली आहे. ९ लाख ७३ १७५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे देशात करोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. करोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं देशातील प्रमाण (रिकव्हरी रेट) ७७.७७ टक्क्यांवर पोहचला आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख दोन हजार ५९६ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनाबळींची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. देशात आतापर्यंत ७८ हजार ५८६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशातील १३ राज्यांत एक लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण झाले आहेत.

करोना चाचणीत वाढ झाल्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत पाच कोटी ६२ लाख ६० हजार ९२८ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.शनिवारी देशात दहा लाख ७१ हजार ७०२ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 9:51 am

Web Title: india covid19 case tally crosses 47 lakh mark with a spike of 94 372 new cases 1114 deaths reported in the last 24 hours nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारांसाठी अमेरिकेत, सोबत राहुल गांधीही
2 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा ‘एम्स’ रुग्णालयात दाखल
3 पूर्व लडाखमधील डावपेचांमध्ये भारताची पहिल्यांदाच चीनवर मात
Just Now!
X