News Flash

Coronavirus: भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा

गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत

संग्रहित (PTI)

भारतात गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात ११७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ३७२ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात सध्या ५२ लाख १४ हजार ६७८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये १० लाख १७ हजार ७५४ अॅक्टिव्ह केसेस असून ४१ लाख १२ हजार ५५२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण, ३९८ मृत्यू
दरम्यान महाराष्ट्रात गुरुवारी २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले. राज्यात आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.९० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची आत्तापर्यंतची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० इतकी झाली आहे. सध्या राज्यात १७ लाख ७० हजार ७४८ होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख १ हजार ७५२ केसेस अॅक्टिव्ह आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 9:55 am

Web Title: india covid19 case tally crosses 52 lakh mark with a spike of 96424 new cases sgy 87
Next Stories
1 नवं संकट? चीनमध्ये हजारो लोकांना ब्रुसेलोसिसचा संसर्ग; जाणून घ्या काय आहे हा आजार
2 थाळी वाजवणं, दिवे लावणं यापेक्षा ‘त्यांची’ सुरक्षा महत्त्वाची; राहुल गांधींची सरकारवर टीका
3 दुर्दैवी! पहिल्यांदाच राज्यसभेत निवडून गेलेल्या भाजपा खासदाराचा करोनामुळे मृत्यू
Just Now!
X