देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही चिंतेचे वातावरण कायम आहे. दिवसाला ९० ते ९५ हजार करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ७० ते ८० हजारांवर पोहचली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६५ लाखांच्या पुढे गेली आहे तर बळींची संख्याही एक लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ७५,८२९ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी झाली. याच कालावधीत ९४० लोकांचा मृत्यू ओढवल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १ लाख एक हजार ७८२ इतकी झाली आहे.


करोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात आताप्यंत ५५ लाख ९ हजार ९६७ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या ९ लाख ३७ हजार ६२५ जणांवर उपचार सुरु आहेत.

देशात करोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, तीन ऑक्टोबरपर्यंत देशात सात कोटी ८९ लाख ९२ हजार ५३४ इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल, शनिवारी ११ लाख ४२ हजार १३१ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.