24 September 2020

News Flash

भारतात करोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० लाखांचा टप्पा

देशभरात १३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

भारतात करोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या आहे. आज सकाळी ही संख्या १९ लाख ६५ हजार होती. मात्र देशभरात ५६ हजार नव्या रुग्णांची भर पडल्याने भारतातील करोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. आत्तापर्यंत १३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर संपूर्ण देशात ४० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे

जगात ज्या देशांमध्ये करोनाचे रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 8:41 pm

Web Title: india crosses 2 million coronavirus cases scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 सामना करणं तर दूरच, चीनचं नाव घेण्याचं धाडसही मोदींमध्ये नाही-राहुल गांधी
2 Coronavirus: प्लाझ्मा थेरपीमुळे मृत्यूचा धोका कमी होत नाही, एम्सच्या चाचणीत महत्त्वाचा निष्कर्ष
3 VIDEO: अमेरिका, ब्रिटनकडून रशियाच्या लसीला कमी लेखण्याचा प्रयत्न पण…
Just Now!
X