04 August 2020

News Flash

चिंता वाढली; २४ तासांत आढळले सर्वाधिक रुग्ण, एकूण करोनाबाधितांची संख्या पाच लाखांच्या पुढे

मृतांची संख्या १५ हजारांच्या पुढे

देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत करोना रुग्ण संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच करोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख ८ हजार ९५३ इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ५५२ करोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३८४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित बळींची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

समाधानकारक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. एक लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दोन लाख ९५ हजार ८८१ जणांनी करोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारून ५७.४३ टक्के झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 10:20 am

Web Title: india crosses 5 lakh mark as it reports highest single day spike of 18552 new covid19 cases nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनिल औषधावरुन बाबा रामदेव आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर दाखल
2 “वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिलला कधी करोनाचं औषध म्हटलंच नाही”
3 सीमेवर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली नाही तर भारतही जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार
Just Now!
X