News Flash

भारत आता लोकशाही देश राहिलाय का? प्रियंका गांधींचा सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा केली आहे

संग्रहीत

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करत भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा केली आहे. जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अद्यापही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यावरुन प्रियंका गांधी यांनी ही टीका केली आहे. ट्विट करत प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय बंदिस्त करण्यात आलं आलं आहे. लाखो लोकंही तिथं अडकली आहेत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही हे सगळं किती दिवस चालणार हे विचारत होतो ? आता आम्ही आपण अद्याप देशात लोकशाही आहे की नाही अशी विचारणा करत आहोत”.

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर खोऱ्यातील सुरक्षेचा विचार करता काही राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि व्यवसायिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. काही राजकारण्यांची नंतर सुटका करण्यात आली होती. पण ओमर अब्दुल्ला, त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना अद्यापही घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 1:48 pm

Web Title: india democracy congress priyanka gandhi jammu kashmir article 370 sgy 87
Next Stories
1 CAA मुस्लीम विरोधी नाही – रजनीकांत मोदी सरकारच्या पाठिशी
2 कुणाल कामरा म्हणतो, “मोदीजी मला विमानामध्ये भेटू नका, नाहीतर…”
3 बाबांनी मला आणि माझ्या भावाला भगवद गीता शिकवली, हा दहशतवाद आहे? हर्षिता केजरीवालचा सवाल
Just Now!
X