26 October 2020

News Flash

भारत-चीन सीमा प्रश्न चिघळणार? भारताकडून सीमेवर आणखी सैनिक तैनात

डोकलाम वाद सुरू असतानाच भारतानं उचलेलं पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय

प्रतिकात्मक छायाचित्र

डोकलामचा प्रश्न सुटलेला नसताना आता भारतानं अरूणाचल प्रदेशाच्या सीमेवर आपल्या सैनिकांची संख्या वाढविली आहे. डोकलाममधून आधी भारतानं सैन्य मागे घ्यावं नाहीतर युद्ध अटळ आहे अशा धमक्या चीनकडून रोज किंवा दिवसाआड दिल्या जातात, अशात भारतानं उचलेलं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. भारताच्या या निर्णयामुळे चीनची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डोकलामच्या सीमा प्रश्नावरून चीनचा पवित्रा आक्रमक आहे, रोज युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत, १९६२ सारखी अवस्था करू असे इशारे दिले जात आहेत म्हणूनच सिक्कीम ते अरूणाचल प्रदेश या सीमाभागात आम्ही सैन्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या अधिकाऱ्यांनी सैनिकांची संख्या वाढविण्यात आल्याची माहिती दिली आहे.

अरूणाचल प्रदेश आणि आसाममध्ये असलेल्या ३ आणि ४ क्रमांकाच्या तुकडीला भारत-चीन सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,  सैनिकांची संख्या नेमकी किती वाढविण्यात आली आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र भारतानं उचलेलं हे पाऊल धमक्या देणाऱ्या चीनसाठी एक इशाराच आहे असंच म्हणता येईल असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांनी डोकलामचा प्रश्न आपसात चर्चा करून सोडवावा असं अमेरिकेनं शुक्रवारीच सुचवलं आहे अशात आता भारतानं सीमेवर सैनिकांची संख्या वाढवून चीनच्या धमक्यांना एकप्रकारे उत्तरच दिलं आहे. डोकलाममध्ये सैनिकांची संख्या वाढविण्यात आलेली नाही मात्र अरूणाचल प्रदेश आणि आसाममध्ये सैनिकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

मागील तीन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये डोकलामचा प्रश्न चिघळला आहे. भारतानं आधी सैन्य मागे घ्यावं अशी मागणी चीनकडून होते आहे, तर चीननं आधी सैन्य मागे घ्यावं अशी मागणी भारताकडून होते आहे. मात्र डोकलाममधून दोन्ही देशांनी आपलं सैन्य मागे घेतलेलं नाही त्यामुळे दोन्ही देशांमधील वाद चिघळला आहे .

आता भारतानं चीनच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये सैनिकांची संख्या वाढवली आहे. चीनकडून सातत्यानं युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत त्या पार्श्वभूमीवर भारतानं उचलेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जातंय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही डोकलाम प्रश्न हा शांततापूर्ण चर्चेनं सोडवावा असं म्हटलं आहे. आता हा डोकलाम प्रश्न सुटणार, की भारत चीनमध्ये सीमा प्रश्न आणखी चिघळणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2017 11:59 pm

Web Title: india deploys more troops along china border in arunachal
Next Stories
1 इजिप्तमध्ये दोन रेल्वेगाड्यांची टक्कर, ३६ प्रवासी ठार
2 सोनिया गांधींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीवर राष्ट्रवादीचा बहिष्कार
3 …तर उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी अमेरिका सज्ज; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Just Now!
X