भारत शाश्वत मार्गानेच वाढीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे त्याचवेळी नागरिकांना विकासाचे फायदे मिळतील याचीही काळजी घेत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती परिषदेत शनिवारी केले.

सेटिंग द कॉनटेक्स्ट फॉर दी इंडस्ट्री ट्रान्झिशन या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट प्रारूप राबवले आहे. त्यानुसार कुठल्याही उत्पादनात दोष राहणार नाहीत व कुठल्याही उत्पादनांच्या निर्मितीत पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. आमचा देश वाढीच्या पथावर मार्गक्रमण करीत आहे. लोकांना आम्ही न्याय नाकारू शकत नाही, त्यांना विकास नाकारू सकत नाही पण आम्ही शाश्वत मार्गाने विकास करू.

Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

हवामान कृती परिषदेचे आयोजन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून त्यात २०१६ मधील पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कृती करण्यास विविध देशांना भाग पाडण्याचा उद्देश आहे.

जावडेकर म्हणाले की, भारतात आम्ही कार्बन गोळा करून त्याचा वापर कारखान्यातील कच्चा माल तयार करण्यासाठी करणार आहोत, टनामागे सहा डॉलर्सचा कार्बन कर लावण्यात आला असून त्यामुळे उद्योगांनाही कोळशाचा वापर कमी करण्याचा विचार करावा लागत आहे. हे धोरण असलेला भारत हा बहुदा एकमेव देश आहे.