News Flash

नव्या करोनामुळे केंद्राचं महत्त्वाचं पाऊल, ब्रिटन-भारत विमानसेवा बंदी वाढवली

करोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी निर्णय

संग्रहित छायाचित्र

करोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० करोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात करोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

ब्रिटन-भारत ब करोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही नव्या करोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून करोनाच्या नव्या विषाणूनं देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या आज (३० डिसेंबर) २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा- नव्या करोनानेही देशात पसरले हातपाय; रुग्णांची संख्या पोहोचली २० वर

विमानसेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विट करून दिली. “ब्रिटन व भारतादरम्यान तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेल्या विमानसेवेला ७ जानेवारी २०२१ पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात कडक नियम पुन्हा लागू केले जाणार आहे. त्यासाठी लवकरच माहिती जाहीर करण्यात येईल,” असं पुरी यांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार वेगानं पसरत असल्याचं समोर आल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनबरोबर हवाई वाहतूक बंद केली. भारतानेही ३१ डिसेंबरपर्यंत हवाई सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात करोनाच्या नव्या प्रकाराने शिरकाव केल्यानंतर एका आठवड्यानं ही मुदत वाढवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 11:45 am

Web Title: india extends suspension of uk flights till january 7 amid worries over new coronavirus strain bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “राज्यघटनेचा पुन्हा अभ्यास करा”; योगी आदित्यनाथांना १०४ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं सणसणीत पत्र
2 विवाहासाठी धर्मांतर मंजूर नाही; राजनाथ सिंह
3 राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय; राजनाथ सिंहाचा पलटवार
Just Now!
X