08 March 2021

News Flash

तेल आयातीमुळे देश आर्थिक संकटात – नितीन गडकरी

मोठया प्रमाणावर तेल आयात करावी लागत असल्यामुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मोठया प्रमाणावर तेल आयात करावी लागत असल्यामुळे देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाचे दर गगनाला भिडले असून तेलाच्या प्रति पिंपाची किंमत ८५ डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

रुपयाची सातत्याने सुरु असलेली घसरण आणि वाढती व्यापारी तूट यावर तोडगा काढण्यासाठी आज महत्वाच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे. त्याआधी गडकरींनी हे विधान केले आहे. तेल आयात करणारा भारत हा जगातील तिसरा मोठा देश असून भारतात वापरल जाणार ८० टक्के तेल परदेशातून आयात केलं जातं. तेलाच्या या वाढलेल्या किंमतीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतं असून भारतात रोजच्या रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत.

यावर्षीच्या सुरुवातीपासून डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये १३ टक्के घसरण झाली आहे. शुक्रवारी सकाळीही बाजार उघडताच शेअर बाजारात तब्बल ६०४ अंकांची घसरण झाली. दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही घसरण सुरु आहे. शुक्रवारी रुपया ७३.७७ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. काल रुपया ७३.३४ वर बंद झाला होता. रुपयामध्ये तब्बल ४३ पैशांची घसरण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 1:40 pm

Web Title: india facing economic crisis says nitin gadkari
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 बाइकवरुन जात असताना अंगावर पडलं ‘केमिकल’, रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
2 धक्कादायक! पवित्र गंगातीरी बलात्काराचा व्हिडिओ, दोघांना अटक
3 सुजुकीने भारतात लॉन्च केल्या दोन नव्या Off Road बाइक्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Just Now!
X