22 January 2021

News Flash

देश मंदीच्या छायेत, सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपी मायनसमध्ये

शुक्रवारी संध्याकाळी केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

करोनाचं संकट, लॉकडाउन या सगळ्यामुळे आपला देश मंदीच्या छायेत आहे हे स्पष्ट होताना दिसतं आहे. कारण सलग दुसऱ्या तिमाहीत जीडीपीमध्ये उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर उमे २३.९ टक्के इतका नोंदवला गेला झाली होती. आता जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी उणे ७.५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली. मागील चाळीस वर्षात पहिल्यांदा जीडीपीमध्ये इतकी घसरण झाली आहे.

पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये ऐतिहासिक अशी उणे २३.९ टक्के घसरण झाली आहे. तर आता दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५ टक्के घसरण झाली आहे. या आकडेवारीमुळे देश आर्थिक मंदीच्या छायेत आहेत हे स्पष्ट होतं आहे. दोन तिमाहीमध्ये जीडीपी म्हणजेच विकासदर हा उणे राहिला तर तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत असल्याचं म्हटलं जातं.

बांधकामासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात ५० टक्के तर उत्पादन क्षेत्रात ४० टक्के घसरण झाी आहे. ही दोन क्षेत्र भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतात.कोणत्याही अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी वस्तूंना असलेल्या मागणीचा आणि खरेदीचा मोठा वाटा असतो. या काळात ६० टक्के घसरण झाली कमी झालेलं उत्पन्न, अनेकांचे रोजगार गेल्याने वाढलेलं बेरोजगारीचं प्रमाण यामुळे लोकांनी खर्च कमी केले आणि उद्योगांनी गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं. करोनाच्या जागतिक संकटामुळे अनेक लहान उद्योग कोलमडून पडले त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला.

गेल्या काही वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे. आरबीआयसह देश आणि परदेशातील आर्थिक संस्थांनी करोना व्हायरसमुळे सप्टेंबरच्या तिमाहीतला अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर नकारात्मक राहिल हा अंदाज वर्तवला होता.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 10:22 pm

Web Title: india gdp contracts 7 5 percent in q2 enters tecnical recession scj 81
Next Stories
1 …म्हणून ऑस्ट्रेलियन सरकारने ‘त्या’ मुस्लीम धर्मगुरुचे नागरिकत्व घेतलं काढून
2 …या कारणामुळं अर्णब गोस्वामींना जामीन दिला; सर्वोच्च न्यायालयाचा खुलासा
3 मी करोनाची लस घेणार नाही, तो माझा अधिकार; ब्राझीलच्या राष्ट्रपतींचं अजब विधान
Just Now!
X