News Flash

करोनामुळे भारत उद्ध्वस्त झाला, चीनने भरपाई द्यावी -डोनाल्ड ट्रम्प

भारतातल्या लोकांना खूप चांगले काम करत आहोत असे म्हणायची सवय आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे

चीनने अमेरिकेला १० ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे असा दावा ट्रम्प यांनी केला आहे (फोटो AP)

करोना विषाणूच्या साथीने भारत उद्ध्वस्त झाला आहे. जगभरात करोना विषाणूचा प्रसार करण्यास कारणीभूत असल्याबद्दल चीनने अमेरिकेला १० ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही मागणी केली आहे. जगभरात करोनामुळे मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. याआधी ट्रम्प यांनी करोनाला चिनी आणि वुहान येथील व्हायरस असल्याचे म्हटले होते.

करोना व्हायरस जगभर पसरण्यावर ही एक दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारतील परिस्थितीची माहिती देत याआधी कधी कोणत्याही आजारामुळे इतके मृत्यू झाले नसल्याचे म्हटले. “भारतात सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. भारतातल्या लोकांना खूप चांगले काम करत आहोत असे म्हणायची सवय आहे. पण सत्य परिस्थिती ही आहे की, देश उद्ध्वस्त झाला आहे. खरं तर, प्राणघातक करोना संसर्गामुळे प्रत्येक देश उद्ध्वस्त झाला आहे. आता चीनने या सर्व देशांना मदत केली पाहिजे,” असे ट्रम्प यांनी म्हटले.

हे ही वाचा >> वुहानच्या प्रयोगशाळेतूनच आला चिनी व्हायरस; १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर भरपाईची ट्रम्प यांची मागणी

“जरी ही घटना दुर्घटनेमुळे झाली असली तरी तुम्ही त्या देशांकडे पाहा ते आता पुन्हा आधीसारखे होणार नाहीत. आपल्या देशावरही याचा वाईट परिणाम झाला आहे. पण बाकीच्या देशांना आपल्यापेक्षा जास्त हानी पोहोचली आहे. त्यामुळे हा व्हायरस कुठून आणि कसा आला याचा शोध घ्यायला हवा” असे ट्रम्प म्हणाले.

हे ही वाचा >> वुहान लॅबमधूनच पसरला करोना विषाणू, अमेरिकन अहवालात शिक्कामोर्तब

२०१९ मध्ये चीनमधील वुहानमध्ये करोनाची लागण झाल्याची पहिली घटना समोर आली होती. करोना विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून बाहेर पडला असावा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनने मात्र वेळोवेळी अमेरिकेचा हा आरोप नाकारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 6:32 pm

Web Title: india has just been devastated by corona china should compensate donald trump abn 97
Next Stories
1 मॉल्स, रेस्तराँमधील गर्दी ठरणार तिसऱ्या लाटेचं कारण; सर्वेक्षणातून समोर आली माहिती
2 “पंतप्रधान आता वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील”, जलमग्न वाराणसीवरुन टीका
3 ‘या’ भाजपा नेत्याने त्यांच्याच सरकारवर केला २१,४७३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
Just Now!
X