स्वदेशी लशींपासून आधुनिक  निदान केंद्रांपर्यंत सर्व माध्यमातून भारताने कोविड १९ साथीला एकात्मिक प्रतिसाद दिला असून त्यातूनच या महासाथीवर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.

आठव्या ब्रिक्स एसटीआय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की भारतात दोन लशी प्रगतीच्या मार्गावर असून यात आयसीएमआर व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार केलेली कोव्हॅक्सीन व सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड यांचा समावेश आहे. या दोन्ही लशी तिसऱ्या टप्प्यात आहेत. भारताने पारंपरिक वैद्यक ज्ञानातूनही करोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.