04 March 2021

News Flash

२०६० मध्ये भारत असेल मुस्लिम लोकसंख्येत नंबर १

भारतात १९ कोटी ४८ लाख मुस्लीम नागरिक आहेत.

संग्रहित छायाचित्र

इंडोनेशियाला मागे टाकून २०६० साली भारत हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश ठरेल असा दावा अमेरिकेच्या थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेने केला आहे.

या संस्थेने जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या पहिल्या १० देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत इंडोनेशिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. इंडोनेशियामध्ये सध्या २१ कोटी मुस्लीम नागरिक आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतात १९ कोटी ४८ लाख मुस्लीम नागरिक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. पाकिस्तान हा मुस्लीम बहुलदेश असुनही त्या देशातील मुस्लीम नागरिकांची संख्या भारतापेक्षा कमी आहे. पाकिस्तानात १८ कोटी ४० लाख मुस्लीम नागरिक आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर बांगलादेश आहे तर पाचव्या क्रमांकावर नायजेरिया आहे. जगातील एकूण लोकसंख्यावाढीचा जो दर आहे, त्यापेक्षा मुसलमानांची संख्या अधिक वेगाने वाढेल, तर हिंदू व ख्रिश्चन यांची वाढ साधारणत: जागतिक लोकसंख्या वाढीच्या दराइतकीच राहील, असे प्यू रिसर्च सेंटरच्या धार्मिक रूपरेषा अंदाजाच्या आकडेवारीत नमूद केले आहे.

ही यादी जाहीर केल्या नंतर थिंक टँक प्यू रिसर्च या संस्थेने एक अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत काही अंदाज वर्तवले आहेत. यांत भारत हा २०६० पर्यंत सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारा देश असेल असा दावा या संस्थेने केला आहे. त्यांच्या मते २०६० साली भारतात मुस्लिमांची संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १९.४ टक्के असेल. तर जगातील एकूण मुस्लीम लोकसंख्या ११.१ टक्के असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 6:21 pm

Web Title: india is largest muslim population country
Next Stories
1 मोदींना देशाच्या प्रश्नांची नाही माझ्या कुटुंबाचीच जास्त काळजी – शरद पवार
2 अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी पडताळणी करा; भारतीय दुतावासाचा विद्यार्थ्यांना सल्ला
3 कौतुकास्पद… मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अमेरिकेहून थेट नागपुरात
Just Now!
X