News Flash

जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज, ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू

भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार

चीन आणि पाकिस्तानकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदल आणखी शक्तिशाली होण्यासाठी सज्ज होत आहे.

चीन आणि पाकिस्तानकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदल आणखी शक्तिशाली होण्यासाठी सज्ज होत आहे. भारत सरकारने ११० लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलरच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल ठेवले आहे. वायूदलाने शुक्रवारी सुरूवातीची निविदा म्हणजे आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन) जारी केले आहे. भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार असेल.

सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल. जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशी कंपनी एका भारतीय कंपनीच्या भागिदारीत नवीन लढाऊ विमानांच्या उत्पादनात उतरतील. या प्रकल्पावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपये खर्च होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय वायूदलाकडे किंमान ४२ फायटर स्क्वॉड्रनची आवश्यकता भासत आहे. पण आतापर्यंत ३१ फायटर स्क्वॉड्रनच आहेत. त्यातील प्रत्येकांत १८ जेट्स आहेत. अशात संरक्षण मंत्रालयाने वायूदलाला एक आणि दोन इंजिनच्या लढाऊ विमानांचा नवीन प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या धोरणानुसार आरएफआय जारी झाल्यानंतर विदेशी कंपन्या कोणत्याही भारतीय कंपन्यांबरोबर एकत्र येत लढाऊ विमाने बनवण्यासाठी पुढे येतील.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, नवी दिल्ली येथील जेन्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचे तज्ज्ञ राहुल बेदी म्हणाले की, हा जगातील सर्वांत मोठा लढाऊ विमानांचा व्यवहार असेल. वायूदल आणि नौदलाला किमान ४०० एक किंवा दोन इंजिन लढाऊ विमानांची गरज आहे. या व्यवहारावर हस्ताक्षर केल्यानंतर तीन वर्षांच्या आत पहिले विमान मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 12:54 am

Web Title: india is ready for the biggest defense deal in the world the process of buying 110 fighter jet
टॅग : Defence Ministry
Next Stories
1 ‘हॅकिंग नाही, हार्डवेअरमधील बिघाडामुळे वेबसाईट डाऊन’
2 नरेंद्र मोदींच्या सभेत खुर्च्या उडवून जाब विचारा, २ कोटी नोकऱ्यांचे काय झाले-जिग्नेश मेवाणी
3 ‘पंतप्रधान मोदींना घाबरलेले विरोधक, मांजर, कुत्रे, साप-मुंगूस यांच्यासारखे एकत्र आलेत’
Just Now!
X