News Flash

बीफ निर्यातीत भारत जगात तिसरा!

बीफ निर्यातीत भारताचा तिसरा क्रमांक पुढची दहा वर्षे कायम राहणार

संग्रहित छायाचित्र

बीफच्या निर्यातीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, पुढच्या दशकभरासाठी भारत बीफ निर्यातीत तिसराच राहण्याची शक्यता आहे असा अहवाल अन्न आणि कृषी संस्था अर्थात एफ.ए.ओ आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (ओ.ई.सी.डी.) या दोन संस्थांनी दिला आहे. या दोन्ही संस्थांनी २०१७ ते २०२६ या दशकभराचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये पुढची दहा वर्षे बीफ निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमाकांवर राहिल असंही नमूद करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी भारतानं १.५६ मिलियन टन बीफ निर्यात केलं, हेच प्रमाण येत्या काळात कायम राहिल असा अंदाज वाटतो आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे. जगात जे बीफ निर्यात केलं जातं त्याचा १६ टक्के वाटा येत्या दहा वर्षांमध्ये भारत उचलेल असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. निर्यातीचं हे प्रमाण २०२६ पर्यंत १.९३ मिलियन टन इतकं झालं असेल असंही या अहवालात म्हटलं आहे.

जागतिक क्रमवारीचा विचार करता, बीफ निर्यातीत भारताचा क्रमांक तिसराच राहिल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. हे बीफ नेमकं काय आहे? गोमांस आहे, म्हशीचं मांस आहे की अजूनही नेमकं काय आहे हे निश्चित सांगता येत नाहीये. एकूण निर्यात होणाऱ्या बीफपैकी बहुतांश मांस हे म्हशीचं असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. म्यानमारनं भारतातल्या जनावरांची आयात केली असंही या अहवालात म्हटलं आहे.

ओईसीडीनं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी  ३६३,०००  टन बीफची आयात भारतानं केली होती. हे प्रमाण पुढील दहा वर्षातही असंच राहू शकतं अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. बीफ निर्यातीत ब्राझिल पहिल्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. ही क्रमवारी पुढील दहा वर्षे अशीच राहू शकते असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

एकीकडे कथित गोरक्षकांचे हल्ले थांबताना दिसत नाहीयेत. गोमांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम तरूणांना किंवा स्त्रियांना लक्ष्य केलं जातं आहे. अशात जागतिक क्रमवारीचा विचार करता बीफ निर्यातीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो हे समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:05 pm

Web Title: india is worlds third biggest beef exporter fao report
Next Stories
1 बिहार: नितीशकुमार मंत्रिमंडळाचा आज विस्तार
2 शरद यादवांनी फोन करून मला पाठिंबा दिला; लालूप्रसाद यांचा दावा
3 गोमांस असल्याच्या संशयावरून दोन महिलांना जमावाकडून मारहाण
Just Now!
X