03 March 2021

News Flash

आमच्या वस्तूंशिवाय भारतीय राहूच शकतच नाही म्हणणाऱ्या चीनला सोनम वांगचुक यांचे उत्तर; म्हणाले…

वांगचुक यांनी चीनला दिलं प्रत्युत्तर

सध्या भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशी वस्तू वापरण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. “सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल,” असं ग्लोबल टाईम्सनं एका लेखात म्हटलं होतं. ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या लेखात सोनम वांगचुक यांचादेखील उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, सोनम वांगचुक यांनीदेखील एका व्हिडीओद्वारे चीनला प्रत्युत्तर दिलं आहे.

“अमूलनं चीनविरोधात एक जाहिरात टाकली होती त्यानंतर त्यांचा अकाऊंट बंद करण्यात आला होता. तसंच काही अॅपही गुगलनं हटवली होती आणि ग्लोबल टाईम्समधईल लेखाविरोधात माझी प्रतिक्रिया काय असा प्रश्न मला विचारण्यात आला. जर ट्विटर आणि गुगलनं असं केलंय तर ती आपल्यासाठी चांगली बाब आहे. आपलं जे औषध आहे ते काम करू लागलंय असं आपण समजलं पाहिजे,” असं सोनम वांगचुक म्हणाले.

“आपण मोठ्या प्रमाणात चीनच्या सामानावर बहिष्कार टाकू लागलो आहोत तसंच चीनची अॅप काढून टाकतो आहेत. एका सर्वेक्षणातून ९१ टक्के जनता चीनच्या सामानावर बहिष्कार टाकू इच्छित असल्याचंही समोर आलं आहे. याचा परिणाम चीनवर होत असून तो गुगल आणि ट्विटरवर दबाव टाकत आहे. याचा अर्थ आपण जे काही करत आहोत ते परिणामकारक ठरत आहे,” असंही ते म्हणाले. “ज्या प्रमाणे ग्लोबल टाईम्सच्या लेखाचा प्रश्न आहे याचाही अर्थही असाच आहे की त्यावरही आपल्या बॉयकॉटचा परिणाम होत आहे. कारण ग्लोबल टाईम्स कोणाच्याही गोष्टींवर टीका करत नाही. ते जर भारतीय चीनच्या सामानाशिवाय राहूच शकत नाही अशी टीका करत असतील तर त्यामागेही काही कारण आहे. आपण चीनच्या सामानाशिवाय शिवाय राहू शकतो का नाही याचा विचार आता आपल्या जनतेनं करायचा आहे. आपल्यामुळे सीमेवरच्या जवानांना कितीही त्रास झाला तरी आम्हाला चीनच्या वस्तू हव्या, अॅप हवी याचं उत्तर आता चीनला नागरिकांनीच द्यावं,” असंही वांगचुक म्हणाले.

काय केली होती टीका?
काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी भावना निर्माण होत असल्याचा आरोप ग्लोबल टाईम्समध्ये छापण्यात आलेल्या एका लेखातून करण्यात आला होता. “सामान्य भारतीयांना चीनविरोधात भडकवण्याची आणि चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न जाणूबूजून केला जात आहे. चीनची उत्पादनं सामान्य भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत आणि ते हटवणं कठिण आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल,” असं ग्लोबल टाईम्सनं एका लेखात म्हटलं होतं.

तसंच भारतीयांना चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रवृत्त करत आहेत,” असंही यात नमूद करण्यात आलं होतं. “सीमेवर भारत आणि चीनदरम्या असलेला तणाव हा गंभीर नाही आणि दोन्ही देश यावर चर्चा करत आहेत. परंतु काही भारतीय माध्यमं आणि काही भारतीय चीनला कलंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं शँघाय इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे झाओ जेनचेंग यांनी या लेखात म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 1:25 pm

Web Title: india ladakh sonam wangchuk gave reply to china global times chinese product comment facebook twitter video jud 87
Next Stories
1 गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी करोना चाचणीच्या नियमांत बदल, नवी नियमावली जाहीर
2 सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथ सिंग यांचे हे ‘अनुभवाचे बोल’ : नवाब मलिक
3 “राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ द्या”
Just Now!
X