News Flash

पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; १००० किलोची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता

ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली.

भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.

यापूर्वी, याच ठिकाणाहून २० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.

या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे. यामध्ये अॅडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.

पृथ्वी क्षेपणास्त्र सन २००३ पासून अद्यापपर्यंत भारतीय लष्कराला सेवा पुरवत आहे. डीआरडीओद्वारे निर्माण करण्यात आलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. काल झालेल्या या क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीच्या चाचणीवर डीआरडीओच्या वैज्ञानिकांची नजर होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 9:58 am

Web Title: india last night carried out a successful night test firing of the prithvi ballistic missile off the coast of balasore odisha aau 85
Next Stories
1 सरकारी उद्योगांच्या विक्रीला विरोध; काँग्रेसच्या आमदाराने कापला स्वतःचा हात
2 Chandrayan2: आपल्या ऑर्बिटरनेच आधी विक्रम लँडरला शोधले; इस्रोने फेटाळला नासाचा दावा
3 वादग्रस्त स्वामी नित्यानंदने अमेरिकेत वसवले स्वत:चे हिंदूराष्ट्र, नाव दिले ‘कैलास’
Just Now!
X