हाथरस प्रकरणाबाबत देशात तीव्र संताप वाढला जात असताना, दुसरीकडे केंद्र सरकार महिला कल्याण आणि महिला सबलीकरणाबाबत देशाचे कौतुक करताना दिसत आहेत. महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत असे मत केंद्रीय महिला आणि स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं. महिलांच्या चौथ्या जागतिक परिषदेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमारम्यान त्या बोलत होत्या.

महिलांची संख्या ही समाजात अर्ध्या स्वरूपात जरी असली तरी त्यांचा प्रभाव समाज, राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर असतो. भारताने आपल्या विकासात सर्व स्तरांवर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदल स्वीकारत आम्ही लोकसभा निवडणुकीच्यावेळी महिलांच्या विकासाठी करण्यात आलेल्या आश्वासनांना पार करत पुढे गेलो आहोत असे स्मृती इराणी म्हणाल्या.

आणखी वाचा- “मीडिया काही दिवसांनी निघून जाईल, आम्ही इथेच आहोत,” हाथरस पीडितेच्या वडिलांना जिल्हा दंडाधिकाऱ्यांची धमकी

भारतात आज सर्वंच क्षेत्रांमध्ये लैगिंक समानतेसाठी सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट करण्यावर भर देण्याचे काम प्राथमिकरित्या केले जात आहे. भारतात बरेच कायदे लैंगिक छळाशी संबंधित आहेत. कामाच्या ठिकाणी , घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षण आणि या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यासाठी गेल्या सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आहेत.

आणखी वाचा- हाथरस : “मुलगी करोनाने मेली असती तर नुकसानभरपाई सुद्धा नसती मिळाली”; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे धक्कादायक वक्तव्य

“वन स्टॉप सेंटर” यासह करोना विषाणूच्या महासाथीदरम्यान महिलांची सुरक्षा आणि कल्याणासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत असे स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितले. भारत आमच्यासाठी आणि आमच्या मुलींसाठी न्याय्य आणि समान संधी निर्माण करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय संस्थासोबत काम करण्यास तयार आहे असंही इराणी यावेळी म्हणाल्या.