News Flash

अन्न सुरक्षेबाबत तडजोड नाही

जागतिक व्यापार संघटनेच्या धोरणानुसार आपले अन्न सुरक्षाविषयक धोरण कोणत्याही परिस्थिती बदलणार नसल्याचे भारताने ठणकावून सांगितले.

| December 3, 2013 01:13 am

जागतिक व्यापार संघटनेच्या धोरणानुसार आपले अन्न सुरक्षाविषयक धोरण कोणत्याही परिस्थिती बदलणार  नसल्याचे भारताने ठणकावून सांगितले. जागतिक व्यापार संघटनेची बाली येथे दोन दिवसांची बैठक होणार आहे. यापाश्र्वभूमीवर भारताने अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे यामुद्दय़ावर ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. अन्न सुरक्षेच्या मुद्दय़ावर विकसित राष्ट्रांच्या भूमिकेबाबत भारताने नाराजी व्यक्त केली असून श्रीमंत राष्ट्र केवळ देखावा करीत असल्याचे म्हटले आहे.
भारताने नुकतेच महत्वकांक्षी अन्न सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या दोन तृतियांश लोकसंख्येला सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. मात्र जागतिक व्यापार संघटनेने निश्चित केलेली नियमावली भारताने स्वीकारली तर ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात अडचण निर्माण होणार आहे.
याप्रकरणी पत्रकार परिषदेत माहिती देताना वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी सांगितले की, अन्न सुरक्षेबाबत जागतिक व्यापार संघटनेतील श्रीमंत राष्ट्रांनी सध्या काढलेला तोडगा स्वीकारार्ह नाही.श्रीमंत राष्ट्रांच्या व्यापारी धोरणांपायी भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणार नाही.भारतात या बाबत राष्ट्रीय अनुकूलता तसेच राजकीय एकवाक्यता असल्याचेही शर्मा यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सध्या काढलेला तोडगा भारताला स्वीकारणे कठीण असल्याचेही ते म्हणाले.
बाली येथे  होणारी ही महत्वाची बैठक विकसनील राष्ट्रांसाठी एक संधी आहे. यावेळी विकसनशील राष्ट्रांनी आपली एकजूट दाखवून श्रीमंत राष्ट्रांचा दबाव धुडकावून लावावा,असे आवाहन शर्मा यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:13 am

Web Title: india not to compromise on food security at wto ministerial meeting anand sharma
टॅग : Food Security Bill
Next Stories
1 बी.ए, बी.एस्सीसारखे पदवी अभ्यासक्रम बंद करून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करणार
2 ‘सोशल मीडिया’च्या प्रचारापुढे निवडणूक आयोगाने हात टेकले
3 सर्वच दोषी लोकप्रतिनिधींना विधिमंडळातून अपात्र करा
Just Now!
X