01 March 2021

News Flash

अभिनंदनला दहा दिवसात पाठवा – भारताचा पाकिस्तानला संदेश

भारतीय वायूसेनेचे वैमानिक के नचिकेत यांना पाकने ताब्यात घेतले होते. त्यावेळी पाकने नचिकेत यांना ८ दिवसानंतर सोडून दिले होते.

१९४९च्या जिनेव्हा परिषदेनुसार युद्धातील लष्करी कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे.

भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांना सहीसलामत भारतात आण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात असून हाच मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९४९च्या जिनेव्हा परिषदेनुसार युद्धातील लष्करी कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे. यात भारतीय आणि पाकिस्तानी लष्कर तसेच बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात एक अनौपचारिक सामंजस्यपणा आहे.

सरासरी दरवर्षी किमान तीन वेळा अशा सीमारेषा ओलांडण्याच्या घटना घडतात. अशावेळी त्या सैनिकाची किंवा कर्मचाऱ्याची ओळख पटली की काही तासांत किंवा काही दिवसांत परत पाठवले जाते. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हस्तांतरित केले जाते.

दरम्यान, वैमानिकांसाठीच्या प्रकरणात जिनेव्हा परिषदेत कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. अशावेळी दिल्ली आणि इस्लामाबाद दोघेही योग्य कालावधी  मान्य करतील. केंद्र सरकारने पाकिस्तानी सरकारला वर्धमान यांना त्वरीत आणि सुरक्षित परत पाठवण्यास सांगितले आहे. १९९९ मध्ये जेव्हा भारतीय वायूसेनेचे वैमानिक के नचिकेत यांना पाकने पकडले होते. त्यावेळी पाकने नचिकेत यांना ८ दिवसानंतर सोडून दिले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ठरवले तर अभिनंदन यांना एका आठवड्याच्या आत किंवा १० दिवसांत परत पाठवले जाऊ शकते. सध्या सरकारसमोर वैमानिक अभिनंदन यांना सुरक्षित परत कसे आणि कधी आणायचे हा मोठा प्रश्न आहे. भारतीय राजदूत अभिनंदन यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 9:53 am

Web Title: india pakistan face off plight of iaf pilot is x factor as govt plans next steps
Next Stories
1 अभिनंदनचे वडील आहेत माजी एअर मार्शल, जाणून घ्या त्यांचे कारगिल आणि मिराज कनेक्शन
2 १५ वर्षांची मैत्री एका कानाखालीने संपवली, गोळी घालून मित्राची हत्या
3 ‘जोपर्यंत पायलटला सोडत नाही तोपर्यंत पाकशी कोणतीच चर्चा नको’
Just Now!
X