News Flash

भारत-पाकने चर्चा करुन तोडगा काढावा, चीनच्या नेतृत्वाखालील SCO चा सल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर दोन्ही देशांनी परस्परांशी चर्चा करुन मार्ग काढावा.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर दोन्ही देशांनी परस्परांशी चर्चा करुन मार्ग काढावा. संघटनेमध्ये शत्रूत्वाची भावना पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन चीनच्या नेतृत्वाखालील शांघाय सहकार्य परिषदेने केले आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने कटिबद्ध असले पाहिजे. अन्यथा एससीओमध्ये सहभागी होणे दोन्ही देशांना कठीण होऊन बसेल असे एससीओ संघटनेचे नवनियुक्त सरचिटणीस व्लादिमीर नोरोव्ह यांनी सांगितले.

दहशतवाद आणि ठराविक दहशतवाद्यांबद्दल भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये असलेल्या मतभेदांवर नोरोव्ह यांनी भाष्य केले नाही. बऱ्याचवर्षाच्या चर्चेनंतर २०१७ साली भारत आणि पाकिस्तानचा एससीओ देशाच्या संघटनेमध्ये समावेश करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमध्ये जुने वैर आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठया प्रमाणावर लष्करी तणाव वाढला होता. त्यामुळे एससीओ परिषदेत दोन्ही देश मतभेद बाजूला ठेऊन सहभागी होणार आहेत का? हा प्रश्न निर्माण झाला.

पाकिस्तान पृरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा दहशतवादी हल्ला घडवून आणला. ज्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर फक्त चीनमुळे मसूद अझहरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश होऊ शकला नाही. चीनने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव हाणून पाडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:47 pm

Web Title: india pakistan resolve differences bilaterally china led sco suggestion
Next Stories
1 पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, सैन्यातील जवान शहीद
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होळीच्या शुभेच्छा
3 जम्मू- काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या गस्ती पथकावर ग्रेनेड हल्ला, तीन जखमी
Just Now!
X