News Flash

भारत पुन्हा खरेदी करणार बंकर फोडणारे स्पाइस-२००० बॉम्ब

७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता

भारताची स्पाइस २००० बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे. या बॉम्बच्या खरेदीमुळे भारताच्या ताकतीमध्ये आणखी वाढ होईल. मागच्यावर्षी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस २००० बॉम्बने नष्ट करण्यात आला होता. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. चीन बरोबर वाद सुरु असताना सैन्यदलांना तात्काळ खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एअरफोर्सकडे स्पाइस २००० बॉम्ब आहेत. पण आता आणखी असे बॉम्ब खरेदी करण्याचा विचार आहे. भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

काय आहे स्पाइस २००० बॉम्ब
भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी.

या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते. पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते.

फक्त अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी बॉम्बसोबत हे स्मार्ट किट वापरले जाते. या तंत्राच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावरुन हवाई दलाला अचूक हल्ला करता येतो. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये टार्गेट मिस होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच पाकिस्तानने घटनास्थळी दीडमहिना कोणाला जाऊ दिले नाही. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 7:10 pm

Web Title: india planning to buy more spice 2000 bombs dmp 82
Next Stories
1 मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी चीननं केले हे अघोरी उपाय
2 “जे लोक नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना…” मोदींनी प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना
3 बोलायचं होतं चीनवर, पण बोलले…; ओवेसींचा मोदींना शालजोडीतला टोला
Just Now!
X