पाणबुडीतून डागता येऊ शकणारे K-4 क्षेपणास्त्र विकसित करण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच K-4 क्षेपणास्त्र नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आता अग्नि-पाच क्षेपणास्त्राच्या तोडीचे पाणबुडीतून डागता येऊ शकणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठले देश या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये येणार?

अग्नि-पाच क्षेपणास्त्राची रेंज पाच हजार किमी आहे. पाणबुडीतून डागता येणारे ५ हजार किमी रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र के-सिरीज मालिकेतील क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम असेल. भारताने पाच हजार किमीपर्यंत रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित केल्यास, संपूर्ण आशिया, आफ्रिकेचा काही भाग, युरोप आणि दक्षिण चीन समुद्रापर्यंत हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होईल.

पाच हजार किमी रेंजचे क्षेपणास्त्र विकसित करण्यासंबंधी डीआरडीओने अद्याप काहीही वाच्यता केलील नाही. मागच्या आठवडयात ३,५०० किमी रेंज असलेल्या के-४ क्षेपणास्त्राच्या सलग दोन चाचण्या यशस्वी झाल्या. हे क्षेपणास्त्र आता पूर्णपणे तयार झाले असून चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत.

अरिहंतवरील बी-०५ क्षेपणास्त्राची रेंज किती?

आयएनएस अरहिंत वर्गाच्या पाणबुडयांवर हे क्षेपणास्त्र आता तैनात करण्यात येईल. के-४ या तीन मीटर लांब क्षेपणास्त्र अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे. सध्या आयएनएस अरिहंतवर बी-०५ हे अण्वस्त्र मिसाइल आहे. याची रेंज ७५० किमी आहे. अमेरिका, रशिया आणि चीनच्या पंक्तीत स्थान मिळवण्यासाठी ५ हजार किमी रेंजच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India plans 5000 km range submarine launched ballistic missile dmp
First published on: 28-01-2020 at 16:31 IST