News Flash

असा आहे भारताचा २०२१ चा राजकीय नकाशा; भाजपा १८ राज्यांमध्ये सत्तेत तर काँग्रेसची सत्ता…

पश्चिम बंगालमधून काँग्रेसचा सुपडा साफ, तर पुडुचेरीमध्येही बसला मोठा फटका

पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपाला सत्ता मिळाली तर इतर तीन राज्यांमधील जनतेनं स्थानिक पक्षांच्या पारड्यात कौल दिल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पश्चिम बंगालसारख्या महत्वाच्या राज्यात एकही जागा जिंकला आली नाही. त्यामुळेच पश्चिम बंगालमधूनही काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. पुडुचेरीमध्येही काँग्रेस ११ वरुन थेट २ जागांपर्यंत खाली घसरल्याचं पहायला मिळत आहे. पुडुचेरीमध्येही भाजपा आणि मित्र पक्षांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारा बहुमताचा जादुई आकडा गाठलाय. पाच राज्यांमधील निवडणुकानंतर काँग्रेस आता केवळ सहा राज्यांमध्ये थेट किंवा युतीमध्ये सत्ता असणारा पक्ष झालाय. देशात भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या १८ इतकी आहे.

भाजपाची एकहाती सत्ता असणारी राज्ये

> गोवा
> गुजरात
> हिमाचल प्रदेश
> कर्नाटक
> मध्य प्रदेश
> उत्तर प्रदेश
> उत्तराखंड

युती करुन सत्तेत असणारी राज्ये

> अरुणाचल प्रदेश (जेडीयू आणि एनपीपीसोबत युती)
> आसाम (आसाम गण परिषदसोबत युती)
> बिहार (जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीसोबत युती)
> हरयाणा (जननायक जनता पार्टीसोबत युती)
> मणिपूर (नॅशनल पिपल्स पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टीसोबत युती)
> मेघालय (युनायटेड डेमोक्रेटीक पार्टी, नॅशनल पिपल्स पार्टी, पिपल्स डेमोक्रेटीक फ्रण्ट, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रेटीक पार्टी)
> मिझोरम (मिझो नॅशनल फ्रण्टसोबत युती)
> नागालॅण्ड (नॅशनलिस्ट डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी)
> सिक्कीम (सिक्कीम क्रांतीकारी मोर्टा, सिक्कीम डेमोक्रॅटीक फ्रण्ट (एलए) सोबत युती)
> त्रिपुरा (इंडिजिनियस पिपल फ्रण्ट ऑफ त्रिपुरासोबत युती)
> पुडुचेरी (ऑल इंडिया एन. आर. काँग्रेससोबत युती)

भाजपा विरोधी पक्षात असणारी राज्ये

> आंध्रप्रदेश
> छत्तीसगड
> दिल्ली
> झारखंड
> महाराष्ट्र
> ओदिशा
> राजस्थान

काँग्रेसचं सरकार असणारी राज्यं

> महाराष्ट्र (शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती)
> राजस्थान
> पंजाब
> छत्तीसगड
> झारखंड (झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्र पक्षांसोबत युती)
> तामिळनाडू (डीएमकेसोबत युती)

काँग्रेस आणि भाजपा दोघांचंही सरकार नसणारी राज्ये

> पश्चिम बंगाल
> तेलंगणा
> आंध्र प्रदेश
> ओदिशा
> केरळ


काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये केवळ २.९४ टक्के मतं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसची ही परिस्थिती पाहता त्यांचा पुढील राजकीय प्रवास हा अधिक आव्हानात्मक असल्याचे संकेत राजकीय जाणकारांनी दिलेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 8:50 am

Web Title: india political map 2021 after five state assembly results scsg 91
Next Stories
1 पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…
2 “पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, करोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या”; भाजपा खासदाराची मागणी
3 “ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री होण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण…”
Just Now!
X