News Flash

भारताची प्रतिक्रिया : अफगाणी राजदूतांच्या मुलीचे अपहरण ‘धक्कादायक’

अलिखिलचे अपहरण करण्यात आलेले नाही या पोलिसांच्या दाव्याचा मंगळवारी पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पुनरुच्चार केला.

(Photo: Twitter@NajibAlikhil)

नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे इस्लामाबादमध्ये झालेले अपहरण ही ‘अतिशय धक्कादायक’ घटना असून, पाकिस्तानने ही घटना नाकारून नव्याने खालची पातळी गाठली आहे, असे भारताने गुरुवारी सांगितले.

अफगाणिस्तानचे राजदूत नजिबुल्ला अलिखिल यांची २६ वर्षांची मुलगी सिलसिला अलिखिल हिचे अज्ञातांनी गेल्या शुक्रवारी इस्लामाबादमध्ये अपहरण करून तिला अनेक तास ओलीस ठेवले होते.

‘ही अतिशय धक्कादायक घटना आहे’, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  हे प्रकरण अफगाणिस्तान व पाकिस्तानशी संबंधित आहे. तथापि, पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी भारताला यात ओढल्यामुळे, पाकिस्तानने संबंधित तरुणीचे म्हणणेच नाकारून नवी खालची पातळी गाठली आहे एवढेच मी म्हणू शकेल, असेही बागची यांनी नमूद केले. अलिखिलचे अपहरण करण्यात आलेले नाही या पोलिसांच्या दाव्याचा मंगळवारी पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पुनरुच्चार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:04 am

Web Title: india reaction abduction afghan ambassador daughter shocking akp 94
Next Stories
1 ‘पेगॅसस’ प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ
2 देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ
3 पोलिसांच्या ‘देखरेखी’खाली २०० शेतकऱ्यांचे आंदोलन
Just Now!
X