News Flash

Coronavirus : देशात २४ तासांत ३,४१७ करोनाबळी

गेल्या एका दिवसात आणखी तीन लाख ६८ हजार १४७ जणांना करोनाची लागण झाली. त्या

| May 4, 2021 04:18 am

नवी दिल्ली : देशात करोनाची लागण होण्याच्या दैनंदिन संख्येत किंचित घट झाली आहे. गेल्या एका दिवसात आणखी तीन लाख ६८ हजार १४७ जणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ वर पोहोचली आहे, असे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी ३४१७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या दोन लाख १८ हजार ९५९ वर पोहोचली आहे. देशात १ मे रोजी चार लाख एक हजार ९९३ जणांना तर २ मे रोजी तीन लाख ९२ हजार ४८८ जणांना करोनाची लागण झाली होती. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या देशात ३४ लाख १३ हजार ६४२ उपचाराधीन रुग्ण आहेत, हे प्रमाण एकूण बाधितांच्या १७.१३ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८१.७७ टक्के इतके आहे.

करोनातून आतापर्यंते एक कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले असून मृत्युदर १.१० टक्के इतका आहे. गेल्या २४ तासात ३४१७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६६९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण दोन लाख १८ हजार ९५९ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ७० हजार २८४ जणांचा समावेश आहे, असेही सांगण्यात आले.

आंध्र प्रदेशमध्ये बुधवारपासून अंशत: संचारबंदी

अमरावती : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये बुधवारपासून पुढील दोन आठवडय़ांसाठी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंशत: संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी उच्चस्तरीय बैठकीत स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सोमवारी हा निर्णय जाहीर केला. दुकाने सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी निर्बंध अधिक कडक केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:41 am

Web Title: india record 3417 dead in 24 hours due to coronavirus zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आपत्काळासाठी प्राणवायूचा राखीव साठा
2 केंद्रीय लसधोरण आरोग्यहक्कास बाधक; बदलाचे निर्देश
3 “भारतात करोनामुळे अजून वाईट स्थिती येईल”, गुगल सीईओ सुंदर पिचाई यांचं भाकीत
Just Now!
X