01 March 2021

News Flash

Coronavirus : देशभरात २४ तासांत २६ हजार ६२४ नवे करोनाबाधित, ३४१ रुग्णांचा मृत्यू

करोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ३१ हजार २२३ वर

संग्रहीत

देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने एक कोटींचा टप्पा पार केलेला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ६२४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, याच कालावधीत देशात २९ हजार ६९० जण करोनामुक्त देखील झाले आहेत. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ३१ हजार २२३ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ५ हजार ३४४ अॅक्टिव्ह केसेस असून, ९५ लाख ८० हजार ४०२ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत देशभरात १ लाख ४५ हजार ४७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे.

देशात एका महिन्यात जवळपास १० लाख जणांना करोनाची लागण झाल्याने, देशातील करोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी एक कोटीचा टप्पा ओलांडला. असे असले तरी करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले असून ९५.५० लाख जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात १९ डिसेंबरपर्यंत १६,११,९८,१९५ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी ११ लाख ७ हजार ६८१ नमूने काल(शनिवार) तपासण्यात आले असल्याचे आयसीएमआरच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.

आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सह आजार असलेले लोक तसेच पन्नाशीवरील नागरिक अशा लक्ष्य समूहातील तीस कोटी लोकांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण तातडीने करण्याची गरज आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी व्यक्त केली. कोविड १९ उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या बैठकीत ते बोलत होते.

उच्चस्तरीय मंत्रिगटाकडून साथीचा आढावा

तसेच, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले, की करोना साथीच्या वाढीचे प्रमाण २ टक्क्य़ांच्या खाली गेले असून मृत्यू दर जगात सर्वात कमी म्हणजे १.४५ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ९५.४६ टक्के असून १० लाख चाचण्या करण्याच्या धोरणामुळे आवर्ती रुग्णवाढीचा दर ६.३५ टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील सणासुदीच्या काळानंतरही करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही. याचे कारण चाचण्यांचे वाढते प्रमाण हे आहे, असे देखील आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 11:17 am

Web Title: india records 26624 new covid 19 cases and 341 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अयोध्या : पाच एकर जागेवर उभारण्यात येणार मशीद; डिझाईन झालं प्रसिद्ध
2 शेतकरी आंदोलनास पाठिंब्यासाठी हनुमान बेनीवील यांचा तीन संसदीय समित्यांचा राजीनामा
3 शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी आज देशभर श्रद्धांजली सभांचे आयोजन
Just Now!
X