26 October 2020

News Flash

दिलासादायक… करोनाविरुद्धच्या लढाईला ‘रेकॉर्डब्रेक’ यश; २४ तासांमध्ये एक लाख रुग्ण झाले करोनामुक्त

रिकव्हरी रेट ८० टक्क्यांहून अधिक

फोटो सौजन्य - एएनआय, प्रातिनिधीक छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाबाधितांच्या संख्येत उच्चांक नोंद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु गेल्या चोवीस तासांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांमध्ये देशात करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येनंही उच्चांक गाठला आहे. गेल्या चोवीस तासांत देशातील १ लाख रूग्णांनी करोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे सतत ९० हजारांच्या वर वाढणारी रुग्णसंख्याही आता कमी होऊन ती ७५ हजारांवर आली आहे.

देशातील करोनाविरोधातील लढ्याला यश मिळताना दिसत असून गेल्या चोवीस तासात देशांत एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त झाल्याची नोंद करण्यात आली. देशातील करोना मुक्त रुग्णांची संख्या आता ४४ लाख ९७ हजार ८६७ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो ८०.८६ टक्क्यांवर पोहोचला असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७५ हजार ८३ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहचली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहोचली असून देशात ९ लाख ७५ हजार ८६१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत एकूण ८८ हजार ९३५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:45 pm

Web Title: india records highest single day recoveries with over 1 lakh patients recovering in last 24 hours jud 87
Next Stories
1 तीन वर्षांपूर्वी चीन डोकलाममधून मागे हटला पण त्यानंतर…
2 मोदीजींचा हेतू ‘स्वच्छ’, कृषी-विरोधी नवा प्रयत्न – राहुल गांधी
3 “जे दहशतवाद्यांना शहीद म्हणतात…”; काश्मीर मुद्द्यावरुन UN मध्ये भारतानं पाकिस्तानला सुनावलं
Just Now!
X