एमक्यूएम ला (मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट) भारतातून निधी व प्रशिक्षण मिळत असल्याचा आमचा संशय खरा ठरला असून देशात अशांतता निर्माण करण्यात भारताचा हात असल्याचे बीबीसीच्या वृत्तामुळे स्पष्ट झाले आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, एमक्यूएम ला भारतातून निधी व प्रशिक्षण मिळत असल्याच्या बातम्या बीबीसीने दिल्या आहेत, त्यामुळे पाकिस्तानच्या हातात भारताविरोधात आयते कोलित मिळाले आहे. अंतर्गत सुरक्षामंत्री निसार अली खान यांनी ब्रिटिश उच्चायुक्त फिलीप बार्टन यांच्याशी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले, की  गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये भारत अशांतता निर्माण करीत आहे. दरम्यान, भारताने बीबीसीच्या वृत्ताचे खडंन केले असून ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.
खान यांनी असा आरोप केला, की भारताच्या नेत्यांनीही पाकिस्तानात अशांतता पसरवत असल्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पाकिस्तानने ब्रिटनची मदत मागितली असून बीबीसीच्या बातमीचा आणखी तपशील द्यावा, असे ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सांगितले , पाकिस्तानने ब्रिटिश सरकारला ही माहिती मागणारे अधिकृत पत्र द्यावे, असे उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षामंत्र्यांना सांगितले.