News Flash

COVID19 : देशभरात मागील २४ तासात १,३२,०६२ जण करोनामुक्त; ३,३०३ रूग्णांचा मृत्यू

२४ तासांत ८० हजार ८३४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे.

करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे.

देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. देशातील रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ सुरू आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच असल्याने काहीशी चिंता कायम आहे. मागील २४ तासात देशभरात १ लाख ३२ हजार ०६२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८० हजार ८३४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, ३ हजार ३०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २,९४,३९,९८९ झाली असून, आजपर्यंत २,८०,४३,४४६ रूग्ण करोनातून बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. तर, देशभरात आजपर्यंत ३,७०,३८४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव्ह रूग्ण संख्या १०,२६,१५९ आहे.

देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आजपर्यंत २५,३१,९५,०४८ लोकांचे लसीकरण झालेले आहे. तर, करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १२ जून पर्यंत ३७,८१,३२,४७४ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १९,००,३१२ नमुन्यांची काल तपासणी झालेली आहे. आयसीएमआरच्य हवाल्याने हे वृत्त देण्यात आलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 10:55 am

Web Title: india reports 80834 new covid19 cases 132062 patient discharges and 3303 deaths in the last 24 hours msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना मातेचं ‘ते’ मंदिर पाचव्याच दिवशी जमीनदोस्त
2 कुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीचे आदेश
3 करोनावरील आणखी एका औषधाची देशात चाचणी