News Flash

Coronavirus: देशात ३,४०३ करोनामृत्यूंची नोंद, तर ९१,७०२ नवबाधित

नजर टाकूया देशातल्या करोना आकडेवारीवर....

देशातल्या करोना रुग्णांची कमी होत चाललेली संख्या पुन्हा वाढू लागली आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशातला करोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली रुग्णसंख्या कालपासून पुन्हा वाढलेली दिसत आहे. त्याचबरोबर मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे देशवासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

करोनाबाधितांची आकडेवारी

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ११ लाख २१ हजार ६७१वर पोहोचली आहे.

करोनामुक्तांची संख्या

देशात काल दिवसभरात एक लाख ३४ हजार ५८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनामुक्तांची एकूण संख्या दोन कोटी ७७ लाख ९० हजार ७३ वर पोहोचली आहे.

मृतांचा आकडा तीन हजारांच्या वर

देशात गेल्या २४ तासांत ३,४०३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता तीन लाख ६३ हजार ७९ वर पोहोचली आहे. तर देशातला मृत्यूदर १.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशातलं लसीकरण…

देशात गेल्या २४ तासांत ३२ लाख ७४ हजार ६७२ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी २९ लाख ५४ हजार ५४७ लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर तीन लाख २० हजार १२५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:38 pm

Web Title: india reports 91702 covid19 cases discharges 3403 deaths in last 24 hrs as per health ministry covid 19 update in india vsk 98
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही? हे धक्कादायक; परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
2 मोदी विरुद्ध योगी हे चित्र करोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपाने ठरवून केलेली रणनीती : नवाब मलिक
3 भाजपाच्या बंगालमधील पराभवानंतर काय म्हणाले होते प्रशांत किशोर?
Just Now!
X