News Flash

दिलासादायक! भारतात सलग १० व्या दिवशी एक हजारापेक्षा कमी मृत्यू; ६३ लाख रुग्णांची करोनावर मात

भारतात गेल्या २४ तासात आढळले ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण

संग्रहित (PTI)

भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.

मंगळवारी ६० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. देशात सलग सहाव्या दिवशी ७५ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. सलग १० व्या दिवशी एक हजारापेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.

१७ सप्टेंबरला भारतात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान ७ ऑगस्टला भारताने २० लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला होता. तर २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाखांच्या पुढे रुग्णसंख्या गेली होती. यानंतर १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख आणि ११ ऑक्टोबरला ७० लाख अशी रुग्णसंख्या वाढत गेली. सध्या एकूण रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 10:54 am

Web Title: india reports a spike of 63509 covid19 cases in the last 24 hours sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “बांग्लादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी GDP पाडण्याचा मास्टर स्ट्रोक लगावल्याचंही मोदीजी सांगतील”
2 जम्मू-काश्मीर: सणांच्या काळात हिंदुबहुल भागात पाकिस्तानचा घातपाताचा कट – गुप्तचर यंत्रणा
3 राहुल गांधींनी शेलक्या शब्दांत घेतला मोदी सरकारचा समाचार; म्हणाले…
Just Now!
X