News Flash

#Coronavirus: नागरिकांना भारतानं वाचवलं; मालदीवच्या राष्ट्रपतींनी मानले मोदींचे आभार

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला असून याचा सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहर आणि इतर भागातून इतर देशातील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.

नवी दिल्ली : भारतानं मालदीवच्या ७ नागरिकांना चीनमधून सुरक्षित बाहेर काढलं.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला असून याचा सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहर आणि इतर भागातून इतर देशातील नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. भारतातील काही नागरिकही चीनमध्ये वास्तव्यास असून त्यांच्यासह मालदीवच्या ७ नागरिकांची भारत सरकारने विशेष विमानाद्वारे सुखरुप सुटका केली आहे. भारताच्या या कृतीमुळे मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत. ट्विटद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मालदीवचे राष्ट्रपती आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मालदीवच्या ७ नागरिकांना चीनमधील वुहान शहरातून त्वरीत बाहेर काढल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. भारताची ही कृती दोन देशांमधील एक उत्कृष्ट मैत्रीचे आणि सद्भावनेचे चांगले उदाहरण आहे.”

आज (रविवारी) सकाळी चीनमधील वुहानमधून ३२३ भारतीय नागरिकांसह ७ मालदीवच्या नागरिकांना भारताने आपल्या विशेष मोहिमेद्वारे एअर इंडियाच्या विमानातून सुखरुप भारतात आणले. याची माहिती देणारे ट्विट परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले होते. त्यांच्या ट्विटला उत्तर उत्तर देताना मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. मालदीवच्या नागरिकांना वाचवताना ‘शेजारधर्म पहिला’ असेही जयशंकर यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 2:43 pm

Web Title: india rescues maldivian from china in the background coronavirus problem maldives president thanks pm modi aau 85
Next Stories
1 काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला; दोन जवानांसह चार जण जखमी
2 खळबळजनक : विश्व हिंदू महासभेच्या अध्यक्षांची गोळ्या घालून हत्या
3 Budget 2020 : स्थावर मालमत्ता, वाहन उद्योगाकडे दुर्लक्ष
Just Now!
X