काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या देशांतील चर्चेचा कणा असून सध्या उभय देशांमध्ये संबंध सुधारण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी भारताचा प्रतिसाद निराशाजनक असल्याचे नवाज शरीफ यांनी सांगितले. ते बुधवारी वॉशिंग्टन येथे बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित पाकिस्तानी जनसमुदायाला संबोधित केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये नवी दिल्लीकडून निराशाजनक प्रतिसाद मिळत आहे. काश्मीर हा उभय देशांतील चर्चेत महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. नवाज शरीफ हे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून ते २२ ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.