19 January 2021

News Flash

करोनाचा वाढता प्रभाव, आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच

करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याने DGCA चा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल. तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये. तर, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 1:34 pm

Web Title: india restricts international flights till 31 december only selected flights allowed sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 भाजपा नेते सुशीलकुमार मोदींचं ‘ते’ ट्विट ट्विटरने केलं डिलीट
2 शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा पेटलं; दिल्ली पोलिसांकडून पाण्याचे फवारे, अश्रुधुरांचा वापर
3 ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या भारतीय इंजिनिअर्सना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातून मोठ्या ऑफर्स
Just Now!
X