05 April 2020

News Flash

S-400 सिस्टिम वेळेत देण्याचा रशियाचा शब्द, संरक्षण व्यवहार १६ अब्ज डॉलरच्या घरात

युद्धासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याच्या पुरवठयाबरोबर उत्पादनाची टेक्नोलॉजी भारताला दिली आहे.

संरक्षण क्षेत्रात रशियाने भारताला नेहमीच मोलाची मदत केली आहे. युद्धासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याच्या पुरवठयाबरोबर उत्पादनाची टेक्नोलॉजी भारताला दिली आहे. लवकरच दोन्ही देशांमधील संरक्षण व्यवहार १६ अब्ज डॉलरच्या पुढे जाणार आहे. एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमसह, कालाश्नीकोव्ह रायफल्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स या  करारांची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.

अलीकडेच लखनऊनमधील डिफेन्स एक्सपोमध्ये भारत-रशियामध्ये १४ सामंजस्य करार झाले. कामोव्ह केए-२२६ हेलिकॉप्टर्ससाठी लागणाऱ्या सुट्टया भागांच्या निर्मितीसाठी रशियन हेलिकॉप्टर्स बरोबर सामंजस्य करार झाला आहे. कामोव्ह केए-२२६ ही २०० हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची भारताची योजना आहे. भारताला २०२५ पर्यंत रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिम मिळणार आहे. कलाश्निकोव्ह एके-२०३ मशीन गन आणि केए-२२६ टी बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची संयुक्त भागदारी प्रकल्पातंर्गत निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी करणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.

S-400 मिसाइल सिस्टिम खरेदी व्यवहारात भारताने रशियाला ६ हजार कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. एस-४०० चे वैशिष्टय म्हणजे ही सिस्टिम शत्रूची फायटर विमाने, ड्रोन, आणि मिसाइल्स शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे. भारताने ऑक्टोंबर २०१८ मध्ये रशियाबरोबर पाच एस-४०० सिस्टिम खरेदीचा करार केला आहे. एकूण ४० हजार कोटीचा हा व्यवहार आहे.

कशी आहे S-400 सिस्टिम
एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण ६०० किमी अंतरावरील १०० लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते. त्यासाठी एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘९ एम ९६ ई’ हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते. ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 5:07 pm

Web Title: india russia defence deals s 400 systems kalashnikov rifles dmp 82
Next Stories
1 ‘…तर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ’
2 “मुस्लीम कब्रस्तानाच्या जागी राम मंदीर बांधणं उचित आहे का?”
3 शरद पवार म्हणतात, “ट्रम्प यांनी गुजरातमधील झोपड्या पाहिल्या तर…”
Just Now!
X