05 August 2020

News Flash

भारतासमोर तेलाचा प्रश्न? सच्चा मित्र रशिया देणार साथ

तेलासाठी पश्चिम आशियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने आता रशियाकडे मोर्चा वळवला आहे.

भारत तेलासाठी पश्चिम आशियावर मोठया प्रमाणात अवलंबून आहे. तेलासाठी पश्चिम आशियावरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने आता रशियाकडे मोर्चा वळवला आहे. दीर्घकाळ तेल पुरवठयाचा करार करण्यासंबंधी भारताने रशियाबरोबर चर्चा सुरु केली आहे. रशियाकडून रॉसनेफ्ट ही तेल कंपनी आणि भारताकडून पेट्रोलियम मंत्रालय या चर्चेमध्ये सहभागी झाले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

तेलासंबंधी करार झाल्यानंतर नैसर्गिक गॅस पुरवठयासंबंधी सुद्धा रशियाबरोबर करार करण्याचा प्रयत्न आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. जगाच्या कुठल्याही भागात विशेषकरुन पश्चिम आशियात काहीही घडले तरी, त्याचा तेल पुरवठयावर परिणाम होणार नाही. त्यादृष्टीने करार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

आर्थिक दृष्टया किफायतशीर असलेल्या समुद्रमार्गाने रशियाने तेल पुरवठा करावा, यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. ऊर्जा स्त्रोतांची वाहतूक करणे हा एक आव्हान असले तरी, पर्याय शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. रशियाचा अति पूर्वेकडचा भाग ऊर्जा स्त्रोतांनी समृद्ध आहे.

तिथे मोठया प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये हायड्रोकार्बन सेक्टरमध्ये सहकार्याचा करार झाला होता. आता तेल आणि गॅस पुरवठयासंबंधी सुरु असलेली चर्चा त्याच कराराचा भाग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 2:13 pm

Web Title: india russia initiate talks for long term oil supply dmp 82
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे हे ऐतिहासिक पाऊल – लष्करप्रमुख
2 अब देखे किसका हात मजबूत है, हमारा या उस कातिल का? : मणी शंकर अय्यर
3 कुठल्याही युद्धासाठी भारतीय लष्कर सज्ज – लष्करप्रमुख नरवणे
Just Now!
X