05 July 2020

News Flash

भारताचा आर्थिक विकास दर करोनामुळे घटणार

जागतिक बँकेचा इशारा

प्रतिनिधिक छायाचित्र

जागतिक बँकेचा इशारा

वॉशिंग्टन : 

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे भारताची आर्थिक विकास कामगिरी खूप वाईट होणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था आता २०२०-२१ मध्ये १.५ टक्के ते २.८ टक्के विकास दर राखू शकेल.

जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाविषयक  आर्थिक अहवालात म्हटले आहे की, २०१९-२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा ३१ मार्चअखेर ४.८ ते ५ टक्के राहील पण नंतर करोना प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तो कमी होणार आहे. आर्थिक क्षेत्रातील कमकुवत कामगिरीने आधीच आर्थिक विकास दर खालावलेला असताना आता भारताला करोनाचा फटका बसला आहे.

आर्थिक वर्ष २१ मध्ये देशांतर्गत पुरवठा व मागणी या दोन्हीवर परिणाम झाला असून त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसणार आहे. जागतिक पातळीवर करोनाचा प्रसार असल्याने देशांतर्गत गुंतवणूकही कमी होणार आहे. २०२१-२२ मध्ये विकास दर पुन्हा पाच टक्के होऊ शकतो पण त्यातही आर्थिक शिस्त व पत धोरणात बदल करावे लागणार आहेत.

होणार काय?

आशियायी विकास बँकेने भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षांत ४ टक्के राहील असे म्हटले आहे, तर जी अँड पी रेटिंगने तो ५.२ टक्क्य़ांवरून ३.५ टक्क्य़ांपर्यंत खाली येईल असे म्हटले आहे. मुडीजने भारताचा आर्थिक विकास दर ५.३ टक्क्य़ांवरून २.५ टक्के होईल असे म्हटले आहे. दक्षिण आशियातील आठ देशांचा विकास दर सहा महिन्यांपूर्वी ६.३ टक्के वर्तवण्यात आला होता, पण आता तो १.८ ते २.८ टक्के राहील असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2020 1:36 am

Web Title: india s economic growth rate will fall due to coronavirus zws 70
Next Stories
1 बांगलादेशचा माजी लष्करी अधिकारी ४५ वर्षांनी फासावर
2 Coronavirus : धार्मिक कार्यक्रमासाठी नेपाळला गेलेल्या तिघा भारतीयांना संसर्ग
3 १५ पाकिस्तानी जवानांसह ८ दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय सैन्याची कारवाई
Just Now!
X