देशातील करोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तर, करोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. मृत्यूंची संख्या कमी होतांना दिसत नाही.

भारतात करोनाचे ६०,४७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही ७५ दिवसानंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर २,७२६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १,१७,५२५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार,  आतापर्यंत देशात २,९५,७०,८८१ करोना बाधीतांची नोंद झाली आहे. यापैकी, ३,७७,०३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,८२,८०,४७२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर देशात आता ९,१३,३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भारतात सध्या रिकवरी दर ९५.६४ टक्के आहे.

गेल्या २४ तासांत करोनाची सर्वाधिक प्रकरणे नोंदविणारी पहिली पाच राज्यात तामिळनाडूत १२,७७२, रुग्ण आढलले. त्याखालोखाल महाराष्ट्रात ८,१२९,  केरळमध्ये ७,७१९, कर्नाटकमध्ये ६,८३५ आणि आंध्र प्रदेशमध्ये ४५४९ रुग्ण आढळले आहेत.  गेल्या २४ तासांत करोनाचे जवळपास ६६ टक्के नवीन रुग्णांची नोंद या पाच राज्यांमधून झाली आहे.

हेही वाचा- Novavax Vaccine करोनाविरोधात ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा!

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

गेल्या २४ तासांत भारतामध्ये २,७२६  मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान करोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत २५,९०,४४,०७२ नागरींकाना लस देण्यात आली आहे.