News Flash

भारतानं चीनी सैनिकाला परत पाठवलं; चुकून केला होता भारतीय हद्दीत प्रवेश

सोमवारी सकाळी पूर्व लडाखमध्ये केली सुटका

संग्रहित छायाचित्र

पूर्व लडाखमध्ये शुक्रवारी भारतीय सैन्यानं पकडलेल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) सैनिकाला आज भारताने पुन्हा चीनकडे सोपवलं. हा चीनी सैनिक ८ जानेवारी रोजी चुकून वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) पार करुन भारतीय हद्दीत आला होता.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक शुक्रवारी सकाळी पूर्व लडाखच्या ‘पँगोंग सो’ या दक्षिणी किनारा क्षेत्रात पकडला गेला होता. तो एलएसीच्या भारतीय हद्दीत आला होता. या सैनिकाला आज (सोमवार) सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पूर्व लडाखमध्ये चुशूल-मोल्दो सीमेवर चीनकडे सोपवण्यात आलं.

गेल्या आठ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे, अशा परिस्थितीत भारतीय लष्करानं या चीनी सैनिकाला अशा वेळी परत पाठवलं आहे. भारतीय लष्करानं सांगितलं होतं की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक एलएसीवर भारतीय हद्दीत आला होता. यानंतर तिथे तैनात भारतीय सैनिकांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यानं सांगितलं की, तो रस्ता भटकल्याने चुकून भारतीय हद्दीत पोहोचला.

चीनी सैन्यानं दिली होती माहिती

चीनने त्यांचा एक सैनिक चीन-भारत सीमाभागात रस्ता चुकल्याची माहिती बीजिंगमध्ये दिली होती. पीएलएच्या अधिकृत वेबसाईटमध्ये म्हटलं होतं की, चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीचा एक सैनिक अंधार आणि गुंतागुंतीच्या भौगोलिक स्थितीमुळे चीन-भारत सीमेवर शुक्रवारी पहाटे रस्ता चुकला असून यासंदर्भात भारताला माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 6:09 pm

Web Title: india sent back chinese soldier he was a mistake to enter the indian border aau 85
Next Stories
1 Car-Free City: खनिज तेल संपल्यावर काय? सौदी उभारतंय अख्खं शहर
2 करोना प्रतिबंध लसीकरण कार्यक्रम कसा असेल? पंतप्रधानांनी सविस्तर केलं स्पष्ट
3 मुलाच्या ऑनलाईन क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वडिलांनी टाकला पॉर्न व्हिडीओ
Just Now!
X