भारताने गुरूवारी ओडिशातील लष्करी तळावर अग्नी ३ या अणवास्त्रवाहून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. स्वदेशी बनावटीचे जमिनीवरून मारा करू शकणारे हे क्षेपणास्त्र ३००० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. भद्रक जिल्हय़ात व्हीलर्स बेटांवर आज सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. ही नेहमीची उपयोजित चाचणी होती, असे एकात्मिक चाचणी क्षेत्राचे संचालक एम. व्ही. के. व्ही. प्रसाद यांनी सांगितले.

अग्नी -३ क्षेपणास्त्र
*लांबी- १७ मीटर
*इंधन- घन
*स्वरूप- आंतरखंडीय
*वजन- ५० टन
*क्षमता- १५०० किलो
*पल्ला-३००० किमी
*निर्मिती- डीआरडीओ व भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हैदराबाद, अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरी