पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने आज पहाटे एअर स्ट्राईक केले तर दुसरीकडे ओडिशाच्या समुद्रकिनारी दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. डीआरडीओकडून ही चाचणी घेण्यात आली. खासकरून लष्करासाठी हे क्षेपणास्त्र बनवण्यात आलेले आहे.


हे क्षेपणास्त्र ट्रकवर बसवण्यात आलेल्या चहू बाजूने फिरु शकणाऱ्या बेसवर हे क्षेपणात्र बसवण्यात येते. तसेच ट्रकच्या मदतीने ते कुठेही सहज वाहून नेता येते. १५ किमी अंतरापर्यंत जमिनीवरुन हवेत मारा करण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक टार्गेटवर हल्ला करु शकते. मध्यम रेंजच्या आपल्या ‘आकाश’ या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी हे नवे क्षेपणास्त्र पूरक असेल.

हे क्षेपणास्त्र समुद्रात बोटीवरुन कमी उंचीवरुन उडणाऱ्या टार्गेटवरही सहज हल्ला करु शकते.