संरक्षण क्षेत्रात भारताने एक मोठा पल्ला गाठला आहे. डीआरडीओने आज स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अँटी रेडिएशन मिसाइलची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्रामुळे भारताची शत्रूवर हवाई हल्ला करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे. या क्षेपणास्त्रामुळे भविष्यात युद्धाची समीकरणं नेमकी कशी बदलू शकतात ते आपण आज समजून घेऊया.

मागच्या काही दिवसांपासून संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे DRDO ने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला आहे. ब्रह्मोस, निर्भय, शौर्य या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यानंतर, डीआरडीओने शुक्रवारी पहिल्यांदाच रुद्रम १ या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रुद्रम १ ने आपल्या पहिल्याच चाचणीत ठरवलेले निकष पूर्ण करणं हे फक्त साधसुध यश नाहीय, कारण या क्षेपणास्त्रामुळे भारताची लष्करी, हवाई शक्ती कैकपटीने वाढली आहे.