इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानातील बालकोट सेक्टरमध्ये बॉम्ब हल्ला केला त्यावेळी तिथे जैश-ए-मोहम्मदचे महत्वाचे दहशतवादी हजर होते अशी माहिती आहे. मौलाना अम्मार, मौलाना तल्हा सैफ, मुफ्ती अझहर खान काश्मिरी आणि इब्राहिम अझहर हे जैशचे दहशतवादी या हल्ल्यात मारले गेल्याची शक्यता आहे. जवळपास ३०० दहशतवादी या हल्ल्यात ठार झाले आहेत.

वरती ज्या दहशतवाद्यांची नावे नमूद केली आहेत ते ठार झाले किंवा नाही याबद्दल ठोस माहिती नाही. काश्मीर आणि अफगाणिस्तानात झालेल्या वेगवेगळया हल्ल्यांसाठी अम्मार जबाबदार होता. तल्फा सैफ मैलान मसूद अझहरचा भाऊ आहे. मुफ्ती अझहर खानकडे काश्मीरमधल्या कारवायांची जबाबदारी होती.

इब्राहिम अझहर आयसी-८१४ च्या अपहरणामध्ये सहभागी होता. एअर फोर्सने बालकोटमधील जैशचा तळ उडवून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीफच्या ताफ्यातील बसला धडकवली. यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत जैशचे अनेक दहशतवादी, सिनियर कमांडर ठार झाले आहेत.