भारत सरकारने उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी यासंबंधीचा आदेश दिला. नियंत्रण रेषेवरील व्यापार मार्गाने पाकिस्तानातून शस्त्रास्त्र, ड्रग्स आणि बनावट नोटांची स्मगलिंग होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेले लोक नियंत्रण रेषेवरील व्यापारामध्ये सहभागी असल्याचे समोर आल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारीच सुरु झाला होता. दोन आठवडयांपासून हा व्यापार बंद होता. पाकिस्तानने तोफ गोळयांचा मारा होत असल्याने भारताने एक एप्रिलपासून व्यापार आणि प्रवास बंद केला होता.