21 January 2021

News Flash

शत्रूच्या रडारांना संपवणाऱ्या रुद्रम-१ ची चाचणी यशस्वी

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे (मेड इन इंडिया) असलेले रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र

डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गोनायझेशनने (डीआरडीओ) शुक्रवारी, ९ ऑक्टोबर २०२० रोजी भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या अँटी रेडीएशन मिसाईल रुद्रम-१ क्षेपणास्त्राची सुखोई-३०द्वारे यशस्वी चाचणी करण्यात आली. डीआरडीओतर्फे ओदीशाच्या समुद्र किनारी असलेल्या तटावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी रुद्रम-१चं यशस्वी परीक्षण करण्यात आलं.

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे (मेड इन इंडिया) असलेले रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचावर डागले जाऊ शकते. तसेच कुठल्याही प्रकारच्या सिग्नल तसेच रेडीएशन पकडण्यासाठी तत्पर आहे. त्याशिवाय आपल्या रडारमध्ये रेडीएशन घेऊन नष्टही करू शकते. विशेष म्हणेजे रुद्रम-१ या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरले जाऊ शकते.

चाचणी यशस्वी झाली असली तरीही रुद्रम-१ या क्षेपणास्त्रात अद्याप काही बदल अपेक्षित आहेत. विकसित करण्याच्या दृष्टीने शुक्रवारी चाचणी करण्यात आली. आठवड्याच्या सुरुवातीलाच डीआरडीओने सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपीडो (SMART) या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. दरम्यान,  रुद्रम-१ च्या यशस्वी परिक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.

संरक्षण क्षेत्रात भारताने आत्मनिर्भर बनण्याचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. त्यादृष्टीने डीआरडीओचे महत्वाचे पाऊल असल्याचं काही दिवसांपूर्वी राजनाथ सिंह म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 4:32 pm

Web Title: india test fires rudram 1 its first anti radiation missile to kill enemy radars nck 90
Next Stories
1 भीमा कोरेगाव: NIA कडून आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा यांच्यासह आठजणांविरोधात FIR
2 गुजरातमध्ये यंदाची नवरात्र गरब्याविनाच
3 Nobel Peace Prize 2020 : कोणीही उपाशी झोपू नये म्हणून संघर्ष करणाऱ्यांचा सर्वोच्च सन्मान
Just Now!
X