News Flash

भारताची लांब पल्ल्याच्या अणुक्षेपणास्त्राची चाचणी

अण्वस्त्रसज्जतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने सोमवारी लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राची सोमवारी बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल दोन हजार

| March 26, 2014 12:15 pm

अण्वस्त्रसज्जतेत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताने सोमवारी लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्राची सोमवारी बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता तब्बल दोन हजार कि.मी. इतकी आहे. या चाचणीमुळे भारत काही मोजक्या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे.
बंगालच्या उपसागरात पाणबुडीतून सोडण्यात आलेल्या या आंतरखंडीय क्षेपणास्त्राने सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
भारताने विकसित केलेल्या पाण्याखालून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या यादीतील हे सर्वात लांबपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. यामुळे जमिनीवरून, हवेतून तसेच पाण्याखालून मारा करण्याची क्षमता आता भारताने मिळवली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अंटोनी यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2014 12:15 pm

Web Title: india test nuclear missile
Next Stories
1 सुषमा स्वराज यांच्या प्रचारातून नरेंद्र मोदी गायब!
2 मद्यसेवन आणि हुंडा घेण्यास पंचायतीचा मज्जाव
3 सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ थरूर यांना भोवणार?
Just Now!
X