News Flash

तणाव कायम असल्यामुळे भारत चीन सीमेवर आणखी ३५ हजार सैनिक तैनात करणार

...तो पर्यंत माघार नाही

संग्रहित छायाचित्र

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावातून मार्ग निघण्याची शक्यता धुसर झालीय. एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत चीनला लागून असलेल्या सीमाभागांमध्ये आणखी ३५ हजार जवान तैनात करण्याची तयारी करत आहे.

या निर्णयामुळे लष्करी खर्चात आणखी वाढ होणार आहे असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. भारताची ३,४८८ किलोमीटरची सीमारेषा चीनला लागून आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. त्यानंतर पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक, रणगाडे, तोफा, फायटर विमाने तैनात केली. ब्लूमबर्गने हे वृत्त दिले आहे.

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेकडे बघण्याचा दृष्टीकोन आता कायमचा बदलून गेला आहे असे दिल्ली स्थित थिंक टँकचे संचालक आणि निवृत्त मेजर जनरल बी.के.शर्मा म्हणाले. “सर्वोच्च राजकीय स्तरावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत दोन्ही बाजू माघार घेणार नाहीत” असे शर्मा म्हणाले.

सध्या दोन्ही बाजूंमध्ये चालणाऱ्या चकमकी थांबल्या आहेत. दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये सैन्य मागे हटलं आहे असं चीनचं म्हणण आहे. पण भारताला त्यांचा दावा मान्य नाहीय. आता दोन्ही बाजू पाचव्या फेरीच्या चर्चेची तयारी करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:08 pm

Web Title: india to add 35000 troops along china border dmp 82
Next Stories
1 १० ऑगस्टपर्यंत करोनाची लस उपलब्ध होणार, रशियाचा दावा
2 धक्कादायक! गव्हाच्या पीठात विष मिसळून न्यायाधीशांची हत्या, महिला आणि मांत्रिकासह सहा जणांना अटक
3 अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामाची 3D प्रतिमा
Just Now!
X